महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १६८ :
१.(ग्राम-पोलीस आणि राखीव पोलीस यासंबंधीच्या कायद्यांची (बचाव) व्यावृत्ती 🙂
या अधिनियमातील कोणत्याही गोष्टीचा, मुंबई ग्राम पोलीस अधिनियम, १८६७, २.(मुंबई राज्याच्या कच्छ प्रदेशात अमलात असलेला तो अधिनियम किंवा सौराष्ट्र ग्राम पोलीस अध्यादेश १९४९ किंवा राज्याच्या कोणत्याही भागात अमलात असलेला कोणताही तत्सम विधी) याच्या किंवा राखीव पोलिसासंबंधी करण्यात येईल अशा कोणत्याही अधिनियमाच्या अपबंधावर परिणाम होणार नाही.
——–
१. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम ३५ (२) अन्वये मूळ समास टीपेऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम ३५ (१) अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.