महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १६३ :
जाहीर नाटीसा कशा देतात :
या अधिनियमाच्या कोणत्याही उपबंधान्वये देणे आवश्यक असेल अशी कोणतीही जाहीर नोटीस ही लेखी व सक्षम प्राधिकाऱ्याच्या सहीनिशी असेल आणि ती ज्या स्थानास लागू होईल त्या स्थानामध्ये ती ठळकरीत्या दिसेल अशा सार्वजनिक जागेत तिच्या प्रती चिकटवून किंवा दवंडी पिटवून, तिची घोषणा करुन किंवा उक्त अधिकाऱ्यास योग्य वाटेल अशा इंग्रजी किंवा प्रादेशिक भाषेतील किंवा हिंदीतील स्थानिक वर्तमानपत्रात तिची जाहीरात देऊन किंवा या साधनांपैकी कोणत्याही दोन किंवा अधिक साधनांनी किंवा त्यास योग्य वाटेल अशा कोणत्याही साधनांनी प्रसिद्ध करण्यात येईल.