Bp act कलम १५: पोलीस अधिकाऱ्यास निलंबित केल्याचा परिणाम:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १५:
पोलीस अधिकाऱ्यास निलंबित केल्याचा परिणाम:
पोलीस अधिकाऱ्याकडे निहित केलेल्या शक्ती, कामे व विशेष अधिकार अशा पोलीस अधिकाऱ्यास त्याच्या पदावरुन निलंबित केले असेल त्या मुदतीत निलंबित राहतील.
परंतु असे की, अशा व्यक्तीस अशा रीतीने निलंबित केलेले असेल तरी, तो पोलीस अधिकारी म्हणून असण्याचे बंद होणार नाही आणि त्यास निलंबित करण्यात आले नसते तर तो ज्या प्राधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली राहिला असता त्याच प्राधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली राहील.

Leave a Reply