महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १५७ :
तडीपारीच्या कलमे ५५ ५६, १.(५७, ५७-अ आणि ६३ अअ) मध्ये दाखल खटल्यात गृहीत धरावयाच्या गोष्टी :
त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही विधीमध्ये काहीही असले तरीही कलम ५५, ५६ १.(५७, ५७-अ किंवा ६३ अअ) अन्वये दिलेल्या निदेशांचे उल्लंघन केल्याबद्दलच्या खटल्यामध्ये आदेशाची अधिकृत प्रत सादर करण्यात आल्यावर, त्याविरुद्ध सिद्ध करण्यात येईपर्यंत आणि असे विरुद्ध सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपी व्यक्तींवर राहील – खालीलप्रमाणे गृहीत धरण्यात येईल.
अ) तो आदेश या अधिनियमाखाली तो करण्यास सक्षम असलेल्या प्राधिकाऱ्याने केला होता.
ब) उक्त आदेश ज्या मुद्यांवर व ज्या प्रयोजनांसाठी केलेला होता ती अस्तित्वात आहेत आणि उक्त आदेश करणे आवश्यक होते तो ओदश करणाऱ्या अधिकाऱ्याची खात्री झालेली होती, आणि
क) उक्त आदेश अन्यथा वैध आणि या अधिनियमांच्या उपबंधांशी सुसंगत होता.
——–
१. सन १९७६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १५ याच्या कलम ४, अनुसूची अन्वये ५७ किंवा ६३ अअ या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.