महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १५५ :
आदेश व अधिसूचना सिद्ध करण्याची पद्धती :
या अधिनियमाच्या कोणत्याही उपबंधान्वये राज्यशासनाने किंवा दंडाधिकाऱ्याने किंवा अधिकाऱ्याने प्रसिद्ध केलेला किंवा दिलेला कोणताही आदेश किंवा अधिसूचना आणि तो किंवा ती योग्य रीतीने प्रसिद्ध केली आहे हे, त्याची किंवा तिची शासकीय राजपत्रातील एक प्रत किंवा अधिसूचनेस लागू असलेल्या या अधिनियमाच्या कलमाच्या उपबंधानुसार प्रसिद्ध केलेल्या व काढलेल्या मूळ आदेशाची किंवा अधिसूचनेची खरी नक्कल असल्याबद्दल त्या दंडाधिकाऱ्याने किंवा अधिकाऱ्याने प्रमाणित केलेली आदेशाची किंवा अधिसूचनेची एक प्रत सादर करुन सिद्ध करता येईल.