Bp act कलम १५१ : या कायद्याखाली केलेल्या विशिष्ट अपराधासाठी खटला भरणे हे पोलिसांच्या स्वेच्छानिर्णयानुसार असणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १५१ :
या कायद्याखाली केलेल्या विशिष्ट अपराधासाठी खटला भरणे हे पोलिसांच्या स्वेच्छानिर्णयानुसार असणे :
राज्यशासनाने किंवा सक्षम प्राधिकाऱ्याने केलेला नियम किंवा आदेश याचे पालन करुन तसे केले असेल त्याखेरीज, पोलिसांनी कलमे ११७, ११९,१३१, १३४, १३७, १३९, १४० किंवा कलमे १४४ अन्वये शिक्षापात्र असेल अशा अपराधाबद्दल जर अशा अपराधाने गंभीर स्वरुपाची नुकसानी झाली नसेल व ताकीद देताच अपराध करण्याचे बंद केले असेल तर, खटला भरणे आवश्यक असणार नाही.

Leave a Reply