Bp act कलम १५१-अ : १.(विशिष्ट खटले संक्षिप्त रीतीने निकालात काढणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १५१-अ :
१.(विशिष्ट खटले संक्षिप्त रीतीने निकालात काढणे :
१) २.(कलम ११७ अन्वये किंवा कलम १३१ चे ३.(उपखंड) (३), (४) किंवा (५) अन्वये शिक्षापात्र असलेल्या अपराधाची दखल घेणाऱ्या न्यायालयास) आरोपीची सुनावणी होण्यापूर्वी विनिर्दिष्ट तारखेपर्यंत आरोपी व्यक्तीने आपणास अपराध कबूल असल्याबद्दल डाक नोंदणी पत्राने कळवावे आणि न्यायालय विनिर्दिष्ट करील अशी ४.(दोन हजार रुपयांहून) अधिक नसेल इतकी रक्कम न्यायालयाकडे पाठवावी असे आरोपी व्यक्तीवर बजावावयाच्या समन्सवर नमूद करता येईल.
२) जर आरोपी व्यक्तीने अपराध मान्य केला आणि विनिर्दिष्ट रक्कम पाठविली तर तिच्याविरुद्ध गुन्ह्याच्या बाबतीत कोणतीही आणखी कार्यवाही केली जाणार नाही.)
——–
१. सन १९५६ चा मुंबई अधिनियम क्रमांक १ याच्या कलम १७ अन्वये हे कलम समाविष्ट करण्यात आले.
२. सन १९६४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २८ याच्या कलम १० अन्वये कलम ३३ चे पोटकलम (१) या मजकुराने सुरु होणाऱ्या आणि चौकशी करणाऱ्या न्यायालयास या मजकुराने संपणाऱ्या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ३९ (अ) अन्वये परिच्छेद या मजकुराऐवजी हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.
४. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ३९ (ब) अन्वये पंचवीस रुपयाहून या मजकुराऐवजी समाविष्ट केले.

Leave a Reply