महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १४ :
नेमणुकीचे प्रमाणपत्र:
१) १.(निरीक्षकाच्या २.(***) श्रेणीच्या किंवा त्याहून कमी श्रेणीच्या) प्रत्येक अधिकाऱ्यास, त्याची नेमणूक झाल्यानंतर अनुसूची २ मध्ये तरतूद केलेल्या नमुन्याप्रमाणे एक प्रमाणपत्र देण्यात येईल. असे प्रमाणपत्र राज्य शासन सर्वसाधारण किंवा विशेष आदेशांद्वारे विनिर्दिष्ट करील अशा अधिकाऱ्यांच्या मुद्रेनिशी देण्यात येईल.
२) नेमणुकीच्या प्रमाणपत्रात नामनिर्दिष्ट केलेली व्यक्ती ही पोलिस दलात असण्याचे बंद होईल त्या त्या वेळी ते प्रमाणपत्र रद्दबातल होईल किंवा ज्या मुदतीत अशा व्यक्तीस अशा दलातून निलंबित केले असेल त्या मुदतीपर्यंत ते अप्रवर्ती होईल.
——–
१. सन १९५४ चा मुबंई अधिनियम क्रमांक २८ याच्या कलम ३ अन्वये निरीक्षकाच्या दर्जाहून कमी दर्जाच्या ऐवजी समाविष्ट केले.
२. सन १९५३ चा मुबंई अधिनियम क्रमांक २० याच्या कलम ३ अन्वये मजकुर वगळण्यात आला.