Bp act कलम १४४ : विशेष पोलीस अधिकारी म्हणून काम करण्यास हयगय करणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १४४ :
विशेष पोलीस अधिकारी म्हणून काम करण्यास हयगय करणे :
कलम २१ अन्वये विशेष पोलीस अधिकारी म्हणून नेमण्यात आली असेल अशी कोणतीही व्यक्ती, पुरेशा कारणांवाचून असा विशेष पोलीस अधिकारी म्हणून काम करण्यात हयगय करील किंवा काम करण्याचे नाकारील किंवा तिची कर्तव्ये करण्यासाठी तीस देण्यात येईल असा कोणताही वैधरीत्या दिलेला आदेश किंवा निदेश पाळण्यात हयगय करील किंवा तो पाळण्याचे नाकारील तीस, अपराधसिद्धीनंतर १.(दोन हजार रुपयांपर्यंत) वाढविता येऊ शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल.
——-
१. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ३७ अन्वये पन्नास रुपयांपर्यंत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply