महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १४१ :
कलम ५५, ५६, १.(५७, ५७अ आणि ६३-अअ) या अन्वये आदेशांचे उल्लंघन शिक्षा :
जो कोणी कलमे ५५, ५६ १.(५७, ५७अ किवा ६३ अअ) अन्वये दिलेल्या कोणत्याही निदेशास विरोध करील किंवा त्याचे पालन करणार नाही किंवा त्यानुसार वागण्यात कसूर करील किंवा अशा कोणत्याही निदेशास विरोध करण्याचे कामी किंवा त्याचे पालन न करण्याची अपप्रेरणा देईल, त्यास अपराधसिद्धीनंतर, एक वर्षापर्यंत असू शकेल अशी शिक्षा होईल. परंतु ती, लेखी नमूद करावच्या कारणाखेरीज, चार महिन्यांपेक्षा कमी करणार नाही. तसेच तो दंडासही पात्र होईल.
——–
१. सन १९७६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १५ याच्या कलम ४ अनुसूची अन्वये ५७ किंवा ६३अअ या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.