Bp act कलम १२ : विभाग व उपविभाग यांची रचना:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १२ :
विभाग व उपविभाग यांची रचना:
१) राज्य शासनाच्या नियंत्रणास अधीन राहून १.(कोणत्याही क्षेत्राचा) आयुक्त त्यास योग्य वाटेल तर:
अ) २.(त्याच्या प्रभाराखाली असलेल्या क्षेत्रात) पोलीस विभाग पाडील;
ब) त्या विभागांचे उप-विभाग पाडील; आणि
क) अशा विभागांच्या व उप-विभागांच्या हद्दी व मर्यादा ठरवील.
२)असा प्रत्येक विभाग ३.(सहायक आयुक्ताच्या) प्रभाराखाली असेल व असा उपविभाग हा पोलीस निरीक्षकाच्या प्रभाराखाली असेल.
———
१. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ५६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये बृहन्मुंबईचे या मजकुराऐवजी समाविष्ट केले.
२. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ५६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये बृहन्मुंबईत या मजकुराऐवजी समाविष्ट केले.
३. सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये पोलीस अधीक्षकाच्या या मजकुराऐवजी समाविष्ट केले.

Leave a Reply