महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १२३ :
अधिकार नसताना शस्त्र बाळगणे:
जो कोणी, संघराज्याच्या सशस्त्र फौजेतील नसून व त्याप्रमाणे काम करणारा नसून किंवा पोलीस अधिकारी सदस्य नसून, तसे करण्याचा वैध प्राधिकाऱ्याने प्राधिकार दिल्यावाचून कोणत्याही रस्त्यात किंवा सार्वजनिक जागेत कोणतीही तलवार, भाला, गदा, बंदूक किंवा इतर मारक शस्त्र किंवा कोणताही स्फोटक किंवा दाहक पदार्थ घेऊन जाईल तो कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याकडून नि:शस्त्र केला जाण्यास पात्र होईल आणि याप्रमाणे जप्त करण्यात आलेले शस्त्र किंवा पदार्थ आयुक्त किंवा जिल्हा दंडाधिकारी आपापल्या प्राधिकाराखालील क्षेत्रात बसवील असा १.(बारा हजार पाचशे रुपयांहून) अधिक नसेल असा दंड देऊन दोन महिन्यांच्या आत सोडवून घेण्यात आला नाही तर, राज्यशासनाकडे जप्त केला जाईल.
——–
१. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम १९ अन्वये पाचशे रुपयांपर्यंत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.