Bp act कलम ११: १.(आयुक्तांच्या अधिकारतेमधील २.(सहाय्यक आयुक्त)) :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ११ :
१.(आयुक्तांच्या अधिकारतेमधील २.(सहाय्यक आयुक्त)) :
१) राज्य शासनाला ३.(कलम ७ अन्वये ज्या क्षेत्रासाठी पोलीस आयुक्ताची नेमणूक करण्यात आली आहे, अशा कोणत्याही क्षेत्रासाठी) त्यास योग्य वाटतील इतके ४.(सहाय्यक पोलीस आयुक्त) नेमता येतील.
२) पोट-कलम(१) अन्वये नेमण्यात आलेला ५.(सहाय्यक आयुक्त) या अधिनियमाच्या उपबंधांन्वये किंवा त्या वेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही विधिअन्वये वापरता येतील अशा शक्तींचा वापर करील व पार पाडता येतील, अशी कर्तव्ये व कामे पार पाडील किंवा राज्य शासनाच्या सर्वसाधारण किंवा विशेष आदेशान्वये आयुक्ताने त्यास नेमून दिल्या असतील अशा शक्तींचा वापर करील व अशी कर्तव्ये व कामे पार पाडील:
परंतू असे की, ६.(कलम ३३ अन्वये नियम करणे, त्यांत बदल करणे किंवा ते विखंडित करणे या संबंधीच्या) शक्तीचा ७.(सहाय्यक आयुक्तास) वापर करता येणार नाही.
——–
१. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ५६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये अधीक्षक या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ५६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये बृहन्मुंबईसाठी या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
४. सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये पोलीस अधीक्षक या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
५. सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये अधीक्षकाने या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
६. सन १९५६ चा मुंबई अधिनियम क्रमांक १ याच्या कलम २ अन्वये कलम १३ किंंवा ३३ अन्वये या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
७. सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये अधीक्षकास या मजकुराऐवजी समाविष्ट केले.

Leave a Reply