भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४५० :
न्यायदंडाधिकाऱ्यांनी खटले काढून घेणे :
१) कोणत्याही मुख्य न्याय दंडाधिकाऱ्याला आपणांस दुय्यम असलेल्या दंडाधिकाऱ्याकडून कोणताही खटला काढून घेता येईल किंवा आपण त्याच्याकडे सोपवलेला कोणताही खटला परत मागवता येईल व त्याला स्वत:ला अशा खटल्याची चौकशी किंवा संपरीक्षा करता येईल, अथवा त्याची चौकशी किंवा संपरीक्षा करण्यास सक्षम असलेल्या अशा अन्य कोणत्याही दंडाधिकाऱ्याकडे तो चौकशीसाठी किंवा संपरीक्षेसाठी निर्देशित करता येईल.
२) कोणत्याही न्याय दंडाधिकाऱ्याला, त्याने कलम १९२ त्या पोटकलम (२) खाली अन्य कोणत्याही दंडाधिकाऱ्याकडे सोपवलेला कोणताही खटला परत मागवता येईल व त्याला स्वत:ला अशा खटल्याची चौकशी किंवा संपरीक्षा करता येईल.