Bnss कलम २४ : द्रव्यदंड भरण्यात कसूर झाल्यास कारावासाची शिक्षा :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २४ :
द्रव्यदंड भरण्यात कसूर झाल्यास कारावासाची शिक्षा :
१) दंडाधिकाऱ्याचे न्यायालय द्रव्यदंड भरण्यात कसूर झाल्यास भोगावयाचा कारावास म्हणून कायद्याव्दारे प्राधिकृत असेल तेवढया मुदतीची शिक्षा देऊ शकेल. परंतु, ती मदत
(a) क) (अ) कलम २३ खालील दंडाधिकाऱ्याच्या अधिकारांच्या कक्षेबाहेर नसावी;
(b) ख) (ब) जेथे मुळ शिक्षेचा भाग म्हणून कारावासाची शिक्षा देण्यात आली असेल तेथे, अपराधाबद्दल द्रव्यदंड भरण्यात कसूर झाल्यास भोगावयाचा कारावास म्हणून नव्हे, तर अन्यथा जितक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा देण्यास दंडाधिकारी सक्षम असेल तिच्या एक-चतुर्थांशापेक्षा अधिक नसावी.
२) या कलमाखाली देण्यात आलेला कारावास दंडाधिकाऱ्याने कलम २३ खाली देण्याजोग्या कमाल मुदतीच्या कारावासाच्या मुळ शिक्षेव्यतिरिक्त असू शकेल.

Leave a Reply