भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
प्रकरण ८ :
मालाची जप्ती आणि ताबा या संदर्भात मदत आणि कार्यवाहीकरता आपसात करावयाची व्यवस्था :
कलम १११ :
व्याख्या :
या प्रकरणात विराधी मतप्रदर्शन नसेल तर:
(a) क) (अ) करार करणारे राज्य : याचा अर्थ भारताबाहेर असलेला कोणताही देश अगर जागा ज्यांचे संदर्भात केंद्र सरकारने त्या देशाच्या सरकारपाशी करार अगर तह करून आपसात व्यवस्था केली आहे.
(b) ख) (ब) ओळखणे यात, अपराध केल्यामुळे संपत्ती प्राप्त झाली आहे किंवा अपराध करण्यासाठी तो उपयोगात आणली आहे, हे सिद्ध करण्याचाही अंतर्भाव होतो.
(c) ग) (क) अपराधाचे उत्पन्न: म्हणजे कोणत्याही व्यक्तीने प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्षपणे फौजदारी कृत्ये करून (यात चलनी नोटांची अदलाबदल अपराध) मिळवलेली मिळकत अगर त्याची किंमत.
(d) घ) (ड) मिळकत (संपत्ती) याचा अर्थ, प्रत्येक प्रकारची संपत्ती आणि मत्ता, मग ती मूर्त किंवा अमूर्त असो, जंगम किंवा स्थावर असो, स्पष्ट किंवा संदिग्ध असो आणि अपराध करताना प्राप्त झालेल्या किंवा वापरलेल्या अशा संपत्तीवरील किंवा मत्तेवरील हक्काचा किंवा त्यातील हित-संबंधाचा पुरावा असणारे विलेख आणि संलेख, असा आहे आणि त्यात अपराधापासूनच्या उत्पन्नाच्या द्वारे मिळालेल्या संपत्तीचा अतंर्भाव आहे;
(e) ङ) (इ) शोध घेणे (मागोवा काढणे) : याचा अर्थ, संपत्तीचे स्वरुप, मूळ साधन, संपत्ती व्यवस्था, स्थानांतरण, हक्क किंवा मालकी ठरवणे, असा आहे.