भारतीय न्याय संहिता २०२३
विवाहासंबंधीच्या अपराधांविषयी :
कलम ८० :
हुंडाबळी :
कलम : ८० (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : हुंडाबळी.
शिक्षा : ७ वर्षांपेक्षा कमी नाही परंतु आजन्म असू शकेल असा कारावास.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
१) ज्या वेळी एखादया विवाहित स्त्रीचा मृत्यू विवाहापासून सात वर्षाचे आत घडून आला आहे आणि तो जाळपोळ करुन, अगर दुखापती करुन, किंवा नेहमीपेक्षा इतर परिस्थितीत घडून आलेला आहे, असे दाखवून देण्यात आले की तिच्या मृत्यूपूर्वी तिला क्रूरपणे वागविले जात होते किंवा जाच (छळवणूक) होत होती आणि तो तिचा नवरा, किंवा नातेवाईक करत होते हाणि त्यामागे हुंडयाची मागणी असेल, तर अशा मृत्यूस हुंडाबळी असे म्हटले जाईल आणि नवऱ्याने आणि नातेवाइकांनीचतो मृत्यू घडवून अणला आहे असे मानले जाईल.
स्पष्टीकरण:
या पोटकलमाच्या प्रयोजनार्थ (कारणाकरिता) हुंडा याचा अर्थ हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१ (१९६१ चा २८), याच्या कलम २ मध्ये जो आहे तोच असेल.
२) जो कोणी हुंडाबळीचा अपराध करील त्याला सात वर्षापेक्षा कमी नाही इतक्या मुदतीच्या कारावासाची परंतु आजन्म कारावासाची असू शकेल इतक्या मुदतीची शिक्षा होऊ शकेल.