Bns 2023 कलम ७३ : परवानगीशिवाय न्यायालयाच्या कार्यवाही संबंधित कोणतीही बाब मुद्रित किंवा प्रकाशित करणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ७३ :
परवानगीशिवाय न्यायालयाच्या कार्यवाही संबंधित कोणतीही बाब मुद्रित किंवा प्रकाशित करणे :
कलम : ७३
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कार्यवाहीबाबत न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणताही मजकूर मुद्रित किंवा प्रकाशित करणे.
शिक्षा : दोन वर्षाचा कारावास आणि द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———-
जो कोणी कलम ७२ मध्ये निर्देशिलेल्या (दर्शविलेल्या) अपराधाच्या संबंधात न्यायालयासमोर चाललेल्या कोणत्याही कार्यवाहीबाबत अशा न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणताही मजकूर मुद्रित किंवा प्रकाशित करील त्याला, दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाची कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
स्पष्टीकरण :
कोणत्याही उच्च न्यायालयाच्या किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयाचे मुद्रण किंवा प्रकाशन हे या कलमाच्या अर्थानुसार अपराध म्हणून गणले जाणार नाही.

Leave a Reply