भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २८४ :
भाडे घेऊन एखाद्या व्यक्तीला असुरक्षित किंवा जादा बोजा लादलेल्या जलयानामधून जलमार्गे नेणे :
कलम : २८४
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : भाडे घेऊन एखाद्या व्यक्तीला ज्यामुळे तिचे जीवित धोक्यात येईल अशा असुरक्षित स्थितीत किंवा इतका बोजा लादलेल्या जलयानातून जलमार्गे नेणे.
शिक्षा : ६ महिन्यांचा कारावास, किंवा ५००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
ज्यामुळे एखाद्या व्यक्तीचे जीवित धोक्यात येईल अशा स्थितीत एखादे जलयान असताना किंवा त्यावर इतका बोजा लादलेला असताना जो कोणी त्या व्यक्तीला भाडे घेऊन त्या जलयानातून जलमार्गे जाणीवपूर्वक किंवा हयगयीने नेईल किंवा नेववील त्याला, सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा पाच हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, दोन्ही शिक्षा होतील.