भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २४७ :
देय नसलेल्या रकमेसाठी कपटीपणाने हुकूमनामा मिळवणे :
कलम : २४७
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : आपणास देय नसलेल्या रकमेसाठी कपटीपणाने हुकूमनामा मिळवणे किंवा हुकूमनाम्याची पूर्ती झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी घडवून आणणे.
शिक्षा : २ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
जो कोणी देय नसलेल्या रकमेसाठी ,किंवा देय असलेल्याहून अधिक रकमेसाठी अथवा ज्या कोणत्याही मालमत्तेला किंवा तिच्यातील हितसंबंधाला आपण हक्कदार नाही त्यासाठी एखाद्या व्यक्तीविरुध्द कपटीपणाने एखादा हुकूमनामा अगर आदेश मिळवील ,अथवा एखाद्या हुकूमनाम्याची किंवा आदेशाची पूर्ती करण्यात आल्यानंतर किंवा ज्यासंबंधात त्याची पूर्ती करण्यात आली आहे त्या गोष्टीबाबत एखाद्या व्यक्तीविरूध्द त्या हुकूमनाम्याची किंवा आदेशाची अंमलबजावणी करवील अगर होऊ देईल अथवा कपटीपणाने स्वत:च्या नावावर अशी कोणतीही कृती होऊ देईल अगर त्यास परवानगी देईल, तर त्याला, दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा ,किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील .
Pingback: Ipc कलम २१० : देय नसलेल्या रकमेसाठी कपटीपणाने हुकूमनामा