भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २२१ :
लोकसेवक सार्वजनिक कार्ये पार पाडत असताना त्याला अटकाव करणे :
कलम : २२१
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : लोकसेवक आपली सार्वजनिक कार्ये पार पाडीत असताना त्याला अटकाव करणे.
शिक्षा : ३ महिन्याचा कारावास किंवा २५०० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
कोणताही लोकसेवक आपली सार्वजनिक कार्ये पार पाडत असताना जो कोणी इच्छापूर्वक त्याला अटकाव करील त्याला, तीन महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा दोन हजार पाचशे रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
Pingback: Ipc कलम १८६ : लोकसेवक सार्वजनिक कार्ये पार पाडत असताना