भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २०९ :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ याच्या कलम ८४ खालील उद्घोषणेला अनुसरून उपस्थित राहण्याचे टाळणे :
कलम : २०९
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : भारतीय नागरिक संहिता कलम ८४ च्या पोटकलम (१) अन्वये प्रसिद्ध केलेल्या उद्घोषणेद्वारे फर्माविले असेल अशा विनिर्दिष्ट ठिकाणी आणि विनिर्दिष्ट वेळी उपस्थित राहण्यास कसूर केल्यास.
शिक्षा : ३ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
अपराध : या संहितेच्या कलम ८४ च्या पोटकलम (४) अन्वये एखाद्या व्यक्तीला उद्घोषित आरोपी म्हणून अधिघोषित केले असेल अशा बाबतीत.
शिक्षा : ७ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
जो कोणी, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ याच्या कलम ८४ च्या पोटकलम (१) अन्वये प्रसिध्द केलेल्या उद्घोषणेनुसार आवश्यक असल्याप्रमाणे विनिर्दिष्ट ठिकाणी व विनिर्दिष्ट वेळी उपस्थित राहण्यात कसूर करील त्याला तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्हीही शिक्षा किंवा सामुदायिक सेवेची शिक्षा, देण्यात येतील, आणि त्या कलमाच्या पोटकलम (४) अन्वये त्याला उद्घोषित अपराधी म्हणून घोषित करणारी उद्घोषणा करण्यात आली असेल अशा बाबतीत, त्याला सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा देण्यात येईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र असेल.
Pingback: Ipc कलम १७४-अ : १९७४ चा अधिनियम क्र.२ याच्या कलम ८२ खालील