भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १७१ :
निवडणुकांमध्ये गैरवाजवी प्रभाव पाडणे :
१) कोणत्याही निवडणूकविषयक हक्काच्या मुक्त वापरास जो कोणी इच्छापूर्वक अडथळा करील किंवा अडथळा करण्याचा प्रयत्न करील, तर त्याने निवडणुकीत गैरवाजवी प्रभाव पाडण्याचा अपराध केला असे होते.
२) पोटकलम (१) च्या उपबंधांच्या (तरतुदींच्या) व्यापकतेला बाध न येता, जो कोणी-
(a) क) कोणत्याही उमेदवाराला किंवा मतदाराला अथवा उमेदवार किंवा मतदार जिच्यामध्ये हितसंबंधित आहे, अशा कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारची क्षती (नुकसान) पोचवण्याची धमकी देईल, अथवा
(b) ख) उमेदवाराला किंवा मतदाराला, तो किंवा जिच्यामध्ये तो हितसंबंधित आहे अशी कोणतीही व्यक्ती दैवी प्रकोपाचा किंवा पारमार्थिक दूषणाचा विषय होईल किंवा केली जाईल असा समज करून घेण्यास प्रवृत्त करील किंवा प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करील, तो अशा उमदेवाराच्या किंवा मतदाराच्या निवडणूकविषयक हक्काच्या मुक्त वापरास पोटकलम (१) च्या अर्थानुसार अडथळा करतो, असे मानले जाईल.
३) लोकधोरण जाहीर करणे किंवा लोकोपयोगी कारवाईचे वचन देणे किंवा निवडणूकविषयक हक्कास अडथळा करण्याचा उद्देश नसताना वैध (कायदेशीर) हक्काचा नुसता वापर करणे हा या कलमाच्या अर्थानुसार अडथळा असल्याचे मानले जाणार नाही.
Pingback: Ipc कलम १७१-क : निवडणुकांमध्ये गैरवाजवी प्रभाव पाडणे :