भारतीय न्याय संहिता २०२३
प्रकरण ७ :
राज्यविरोधी अपराधांविषयी :
कलम १४७ :
भारत सरकारविरुद्ध युद्ध करणे किंवा तसे करण्याचा प्रयत्न करणे किंवा युद्ध करण्यास अपप्रेरणा (चिथावणी) देणे :
कलम : १४७
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : भारत सरकारविरुद्ध युद्ध करणे किंवा युद्ध करण्याचा प्रयत्न करने किंवा युद्ध करण्यास अपप्रेरण देणे.
शिक्षा : मृत्यू किंवा आजन्म कारावास व द्रव्यदंड
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय
———
जो कोणी भारत सरकार विरुद्ध युद्ध करील, किंवा असे युद्ध करण्याचा प्रयत्न करील, किंवा असे युद्ध करण्यास अपप्रेरणा (चिथावणी) देईल, त्याला मृत्यूची किंवा आजन्म कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यसंडासही पात्र होईल.
उदाहरण :
(क) भारत सरकार विरोधी उठावात सामील होतो. या कलमात व्याख्या केलेला अपराध (क) ने केला आहे.
Pingback: Ipc कलम १२१ : भारत सरकारविरुद्ध युद्ध करणे किंवा तसे ..