भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १३५ :
एखाद्या व्यक्तीला गैरपणे परिरुद्ध करण्याचा प्रयत्न करताना हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे :
कलम : १३५
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : एखाद्या व्यक्तीला गैरपणे परिरुद्ध करण्याचा प्रयत्न करताना हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे.
शिक्षा : १ वर्षाचा कारावास, किंवा ५००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : जिच्यावर हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग केला ती व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
कोणत्याही व्यक्तीला गैरपणे परिरुद्ध करण्याचा प्रयत्न करताना जो कोणी तिच्यावर हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करील त्याला, एक वर्षापर्यन्त असू शकेल इतक्या मुदतीच्या दोन्ही पैकी कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा पाच हजार रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.