गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४
कलम १३ :
मंडळाचे आदेश व इतर संलेख यांचे अधिप्रमाणन :
मंडळाचे सर्व आदेश व निर्णय अध्यक्षाच्या किंवा मंडळाने या बाबतीत प्राधिकृत केलेल्या इतर कोणत्याही सदस्यांच्या स्वाक्षरीने अधिप्रमाणित करण्यात येतील आणि मंडळाने काढलेले इतर संलेख सदस्यसचिवांच्या स्वाक्षरीने किंवा मंडळाने याबाबतीत तशाच प्रकारे प्राधिकृत केलेल्या इतर कोणत्याही अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने अधिप्रमाणित करण्यात येतील.
