Pca act 1988 कलम २३ : १.(कलम १३(१)(अ)) याखालील, अपराधांच्या संबंधातील आरोपांचा तपशील :
भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम २३ : १.(कलम १३(१)(अ)) याखालील, अपराधांच्या संबंधातील आरोपांचा तपशील : फौजदारी प्रक्रिया, संहिता, १९७३ (१९७४ चा २) यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, जेव्हा कलम १३ च्या पोटकलम, (१) २.(खंड (अ)) अन्वये आरोपीवर अपराधविषयक आरोप ठेवण्यात येत असेल तेव्हा, अशा आरोपपत्रामध्ये,…