Constitution अनुच्छेद २८१ : वित्त आयोगाच्या शिफारशी :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २८१ : वित्त आयोगाच्या शिफारशी : राष्ट्रपती, या संविधानाच्या तरतुदींअन्वये वित्त आयोगाने केलेली प्रत्येक शिफारस, तीवर कोणती कारवाई केली त्याचे स्पष्टीकरण करणाऱ्या निवेदनासहित, संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवण्याची व्यवस्था करील.