Constitution अनुच्छेद २३४ : जिल्हा न्यायाधीशांव्यतिरिक्त अन्य व्यक्तींची न्यायिक सेवेतील भरती :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २३४ : जिल्हा न्यायाधीशांव्यतिरिक्त अन्य व्यक्तींची न्यायिक सेवेतील भरती : जिल्हा न्यायाधीशांव्यतिरिक्त अन्य व्यक्तींची राज्याच्या न्यायिक सेवेतील नियुक्ती, राज्य लोकसेवा आयोग व त्या राज्याच्या संबंधात अधिकारिता वापरणारे उच्च न्यायालय यांच्याशी विचारविनिमय करून राज्यपाल, याबाबतीत त्याने स्वत: केलेल्या नियमानुसार करील.