Constitution अनुच्छेद २१५ : उच्च न्यायालये ही अभिलेख न्यायालये असणे :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद २१५ : उच्च न्यायालये ही अभिलेख न्यायालये असणे : प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल आणि त्यास आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याच्या अधिकारासह अशा न्यायालयाचे सर्व अधिकार असतील.