Bsa कलम १० : नुकसानीच्या दाव्यामध्ये रक्कम ठरविण्यासाठी – न्यायालयास मदत करणारी तथ्ये संबद्ध असतात :
भारतीय पुरावा अधिनियम २०२३ कलम १० : नुकसानीच्या दाव्यामध्ये रक्कम ठरविण्यासाठी - न्यायालयास मदत करणारी तथ्ये संबद्ध असतात : ज्या दाव्यांमध्ये नुकसानीची मागणी केली असेल त्यामध्ये जी नुकसानी देववणे आवश्यक असेल तिची रक्कम निर्धारित करणे न्यायालयाला ज्यामुळे शक्य होईल असे कोणतेही तथ्य संबद्ध असते.