Bnss कलम ४४१ : अपर सत्र न्यायाधीशाचा अधिकार :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ४४१ : अपर सत्र न्यायाधीशाचा अधिकार : सत्र न्यायाधीशाच्या कोणत्याही सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे किंवा त्याखाली अपर सत्र न्यायाधीशाकडे वर्ग केलेल्या कोणत्याही खटल्याबाबत, त्याला या प्रकरणाखालील सत्र न्यायाधीशाचे सर्व अधिकार असतील व ते वापरता येतील.