Bnss कलम १०८ : दंडाधिकारी आपल्या समक्ष झडती घेण्याचा निदेश देऊ शकेल :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १०८ : दंडाधिकारी आपल्या समक्ष झडती घेण्याचा निदेश देऊ शकेल : कोणताही दंडाधिकारी, ज्या जागेच्या झडतीसाठी झडती-वॉरंट काढण्यास तो सक्षम असेल अशा कोणत्याही जागेची आपल्या समक्ष झडती घेण्याचा निदेश देऊ शकेल.