अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९
कलम ८ :
अपराधासंबधीतील गृहीतक :
क) १.(आरोपीने या प्रकरणाखालील अपराध केल्याचा दोषारोप करण्यात आलेल्या किंवा असा अपराध केल्याचा वाजवी संशय असलेल्या व्यक्तिला कोणतीही आर्थिक मदत केली) तर विशेष न्यायालय, तद्विरुद्ध असे काही सिद्ध करण्यात आले नाही तर अशा व्यक्तिने त्या अपराधाला अपप्रेरणा (प्रोत्साहन) दिले असे गृहीत धरील;
ख)या प्रकरणाखालील अपराध, व्यक्तिच्या एखाद्या गटाने केला असेल आणि असे सिद्ध करण्यात आले असेल की, करण्यात आलेला अपराध हा, जमिनीसंबंधातील किंवा अन्य कोणत्याही बाबीसंबंधातील एखाद्या विद्यमान विवादाच्या परिणामी आहे तर, असे गृहीत धरण्यात येईल की, अपराध समाईक उद्देशाच्या पुर:सरणार्थ किंवा समाईक लक्ष्य साध्य करण्याच्या दृष्टीने करण्यात आला आहे.
२.(ग)जोपर्यंत असे सिद्ध होत नाही की, अपराध्याला अत्याचारग्रस्ताची (पीडिताची) वैयक्तिक किंवा त्याच्या कुटुंबाची माहिती नव्हती तर न्यायालय असे समजून चालेल की, अपराध्याला अत्याचारग्रस्ताच्या जातीची किंवा जमातीची कल्पना होती.)
——–
१. २०१६ चा अधिनियम क्रमांक १ याच्या कलम ६ द्वारा मूळ मजकुराऐवजी (२६-१-२०१६ पासून) समाविष्ट करण्यात आले.
२. २०१६ चा अधिनियम क्रमांक १ याच्या कलम ६ द्वारा (२६-१-२०१६ पासून) समाविष्ट करण्यात आले.