अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९
कलम ६:
भारतीय दंड संहितेच्या विवक्षित उपबंधांची (तरतुदींची) प्रयुक्ती (लागू करणे) :
या अधिनियमाच्या अन्य उपबंधाच्या अधीनतेने, भारतीय दंड संहितेच्या (१८६० चा ४५) कलम ३४, प्रकरण तीन, प्रकरण चार, प्रकरण पाच, प्रकरण पाच-क (ऐ), कलम १४९ व प्रकरण तेवीसचे संहितेच्या विवक्षित उपबंध (तरतुदी), होईल तेथवर, ते भारतीय दंड संहितेच्या प्रयोजनासाठी जसे लागू होतात तसे या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी लागू होतील.