अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९
कलम ५ :
नंतरच्या दोषसिद्धीबद्दल वाढीव शिक्षा :
जो कोणी, या प्रकरणाखालील एखाद्या अपराधाबद्दल पूर्वीच सिद्धदोष ठरलेला असताना, नंतरच्या दुसऱ्या अपराधाबद्दल किंवा दुसऱ्या अपराधानंतरच्या कोणत्याही अपराधाबद्धल सिद्धदोष ठरला असेल दोषसिद्धीबद्दल त्याला एक वर्षाहून कमी नाही इतकी परंतु जी त्या अपराधासाठी उपबंधित शिक्षेच्या मुदतीइतकी वाढवता येईल एवढ्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा देण्यात येईल.