SCST Act 1989 कलम १२ : कलम १० अन्वये ज्यांच्याविरुद्ध आदेश देण्यात आला आहे त्या व्यकिं्तची मापे आणि छायाचित्रे इत्यादी घेणे :

अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९
कलम १२ :
कलम १० अन्वये ज्यांच्याविरुद्ध आदेश देण्यात आला आहे त्या व्यकिं्तची मापे आणि छायाचित्रे इत्यादी घेणे :
१)जिच्या विरुद्ध कलम १० अन्वये एखादा आदेश देण्यात आला आहे अशी प्रत्येक व्यक्ति विशेष न्यायालय तसे फर्मावील तेव्हा, एखाद्या पोलीस अधिकाऱ्याद्वारे स्वत:ची मापे व छायाचित्रे घेऊ देईल.
२)जर पोटकलम (१) मध्ये निर्देशित केलेली कोणतीही व्यक्ति, अशी मापे किंवा छायाचित्रे घेऊ देण्यास प्रतिकार करील किंवा नाकारील, तर ती घेतली जाणे सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असतील अशा सर्व मार्गांचा वापर करणे कायदेशीर ठरेल.
३)पोटकलम (२) अन्वये मापे वा छायाचित्रे घेऊ देण्यास प्रतिकार करणे किंवा नाकारणे हा भारतीय दंड संहितेच्या कलम १८६ खालील अपराध असल्याचे मानण्यात येईल.
४)ज्यावेळी कलम १० खालील एखादा आदेश प्रत्याèहत (मागे घेणे) करण्यात येईल तेव्हा पोटकलम (२) अन्वये घेण्यात आलेली सर्व मापे आणि छायाचित्रे (व्यस्तचित्रांसह / निगेटिव्हसह) नष्ट केली जातील किंवा जिच्याविरुद्ध असा आदेश देण्यात आला असेल त्या व्यक्तिच्या स्वाधीन केली जातील.

Leave a Reply