SCST Act 1989 कलम ११ : व्यक्तिने क्षेत्रातून निघून जाण्यात कसूर केल्यास आणि काढून लावल्यावर त्या क्षेत्रात पुन्हा प्रवेश केल्यास कार्यपद्धती :

अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९
कलम ११ :
व्यक्तिने क्षेत्रातून निघून जाण्यात कसूर केल्यास आणि काढून लावल्यावर त्या क्षेत्रात पुन्हा प्रवेश केल्यास कार्यपद्धती :
१)ज्या व्यक्तिला कलम १० अन्वये कोणत्याही क्षेत्रातुन निघून जाण्याचा निदेश देण्यात आला आहे त्या व्यक्तिने जर विशेष न्यायालयाने पोटकलम (२) अन्वये दिलेल्या लेखी परवानगीने असेल त्याखेरीज अन्यथा :-
(a) ऐ) क) निदेशित केल्याप्रमाणे निघून जाण्यात कसूर केली तर; किंवा
(b) बी) ख) अशाप्रकारे त्या क्षेत्रातून निघून गेल्यानंतर त्या आदेशात विनिर्दिष्ट केलेल्या कालावधीच्या आत अशा क्षेत्रात पुन्हा प्रवेश केला तर;
विशेष न्यायालय त्या व्यक्तिला अटक करवण्याची आणि विशेष न्यायालय विनिर्दिष्ट करील अशा क्षेत्राबाहेरील अशा ठिकाणी पोलीस अभिरक्षेमध्ये तिला हलवण्याची व्यवस्था करु शकेल.
२)जिच्या संबंधात कलम १० अन्वये आदेश देण्यात आलेला आहे अशा कोणत्याही व्यक्तिला विशेष न्यायालय लेखी आदेशाद्वारे, अशा आदेशात विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा तात्पुरत्या कालावधीसाठी आणि अशा शर्तीच्या अधीनतेने, तिला जेथून निघून जाण्याचा निदेश देण्यात आला असेल त्या क्षेत्रात परतण्याची परवानगी देऊ शकेल आणि लादण्यात आलेल्या शर्तीच्या यथोचित पालनासाठी, जामीनदारासह किंवा जामीदाराविना एक बंधपत्र करुन देण्यास फर्मावू शकेल.
३)विशेष न्यायालयाला, अशी कोणतीही परवानगी कोणत्याही वेळी प्रत्याèहत (मागे घेणे) करता येईल.
४)जिला एखाद्या क्षेत्रातून निघून जाण्यास निदेशित करण्यात आले असेल अशी कोणतीही व्यक्ति, जेव्हा अशा परवानगीनुसार त्या क्षेत्रात परत येईल तेव्हा ती लादण्यात आलेल्या शर्तीचे पालन करील आणि तिला ज्या तात्पुरत्या कालावधीसाठी परत येण्याची परवानगी देण्यात आली असेल तो कालावधी संपल्यानंतर किंवा असा तात्पुरता कालावदी संपण्यापूर्वी अशी परवानगी प्रत्याèहत (मागे घेणे) करण्यात आल्यावर, अशा क्षेत्राबाहेर निघून जाईल आणि पुन्हा परवानगी घेतल्याखेरीज कलम १० अन्वये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या कालावधीतील न संपलेल्या भागात तेथे परत येणार नाही.
५)एखाद्या व्यक्तिने तिच्यावर लादलेल्या अटींचे पालन करण्यात किंवा त्यानुसार अशा प्रकारे निघून जाण्यात कसूर केली किंवा अशा प्रकारे एखाद्या क्षेत्रातून निघून गेल्यानंतर पुन्हा परवानगी घेतल्याखेरीज अशा क्षेत्रात प्रवेश केला किंवा ती तेथे परत आली तर, विशेष न्यायालय तिला अटक करवण्याची आणि विशेष न्यायालय विनिर्दिष्ट करील अशा क्षेत्राबाहेरील अशा ठिकाणी पोलीस अभिरक्षेमध्ये तिला हलविण्याची व्यवस्था करु शकेल.

Leave a Reply