महिलांचे संरक्षण अधिनियम २००५
कलम २२ :
भरपाई आदेश :
या अधिनियमान्वये देण्यात येतील अशा इतर साहाय्यांव्यतिरिक्त, बाधित व्यक्तीकडून अर्ज करण्यात आल्यावर, उत्तरवादीने केलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या कृतीमुळे बाधित व्यक्तीला झालेल्या इजा, मानसिक छळ आणि भावनिक क्लेश यांसाठी भरपाई आणि नुकसानभरपाई देण्याचे निर्देश उत्तरवादीला देणारे आदेश दंडाधिकारी काढू शकेल.