महिलांचे संरक्षण अधिनियम २००५
कलम १९ :
निवास आदेश :
(१) कलम १२ च्या पोटकलम (१) खालील अर्ज निकालात काढताना कौटुंबिक हिंसाचार झाला आहे याबाबतीत दंडाधिकाऱ्याची खात्री झाली तर, तो निवास आदेश काढील,
(a)क)(अ) उत्तरवादीला विभागून राहत असलेल्या घरातून बाधित व्यक्तीचा ताबा काढून घेण्यास किंवा इतर कोणत्याही रीतीने ताब्यात बाधा पोहोचवण्यापासून मनाई करणारा आदेश – मग उत्तरवादीला त्या विभागून राहणाऱ्या घरात कायदेशीर किंवा समन्याय हितसंबंध असो वा नसो;
(b)ख)(ब) उत्तरवादीला विभागून राहत असलेल्या घरातून दूर होण्याचा आदेश;
(c)ग) (क) बाधित व्यक्ती ज्या घरात राहत असेल त्या विभागून राहणाऱ्या घरातील कोणत्याही भागात उत्तरवादीस किंवा त्याच्या कोणत्याही नातेवाइकाला प्रवेश करण्यास प्रतिबंध करणारा आदेश;
(d)घ) (ड) विभागून राहत असलेल्या घराचे हस्तांतरण करण्यास किंवा त्याची विल्हेवाट लावण्यास किंवा त्यावर भार निर्माण करण्यास उत्तरवादी प्रतिबंध करणारा आदेश;
(e)ङ)(इ) उत्तरवादीस, दंडाधिकाऱ्याच्या परवानगीने असेल ते खेरीज करून विभागून राहत असलेल्या घरातील त्याच्या हक्काचा त्याग करण्यास प्रतिबंध करणारा आदेश;
(f)च) (फ) बाधित व्यक्ती विभागून राहत असलेल्या घरात ज्या प्रकारच्या निवासव्यवस्थेत राहत असेल त्याच पातळीवरचे पर्यायी निवासस्थान किंवा परिस्थितीनुसार तशी गरज असेल तर, त्यासाठीचे भाडे देण्यासाठी उत्तरवादीला निर्देश देणारा आदेश;
परंतु, खंड (ब) मधील कोणताही आदेश महिलेविरूद्ध देण्यात येणार नाही.
(२) बाधित व्यक्तीला किंवा अशा व्यक्तीच्या कोणत्याही मुलाला संरक्षण देण्यासाठी किंवा त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था पुरविण्यासाठी दंडाधिकाऱ्याला वाजवीपणे आवश्यक वाटतील अशा कोणत्याही अतिरिक्त शर्ती लादता येतील किंवा इतर कोणतेही निर्देश देता येतील.
(३) दंडाधिकाऱ्याला कौटुंबिक हिंसाचार करण्यास प्रतिबंध करण्यासाठी उत्तराधिकाऱ्याला प्रतिभूतीसह किंवा प्रतिभूतीविना बंधपत्र निष्पादित करण्यास भाग पाडता येईल.
(४) पोटकलम (३) खालील आदेश हा फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) याच्या प्रकरण आठ खालील आदेश असल्याचे मानण्यात येईल आणि त्यावर तदनुसार कार्यवाही करण्यात येईल.
(५) पोटकलम (१), पोटकलम (२) किंवा पोटकलम (३) खालील आदेश संमत करताना न्यायालय, बाधित व्यक्तीला संरक्षण देण्यासाठी किंवा तिला किंवा तिच्या वतीने अर्ज करणाऱ्या व्यक्तीला आदेशाचे कार्यान्वयन करण्यात साहाय्य करण्यासाठी, सर्वात जवळच्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याला निर्देश देणारे आदेशही संमत करण्यात येतील.
(६) पोटकलम (१) खालील आदेश काढताना, दंडाधिकारी, पक्षकारांच्या आर्थिक गरजा आणि साधनसंपत्ती विचारात घेऊन भाडे आणि इतर प्रदाने देण्याशी संबंधित आबंधने उत्तरवादीवर लादू शकेल.
(७) ज्या पोलीस ठाण्याच्या अधिकारक्षेत्रात दंडाधिकाऱ्याशी संपर्क साधण्यात आला असेल त्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याला, संरक्षण आदेश कार्यान्वित करण्याचे निदेश दंडाधिकारी देऊ शकेल.
(८) दंडाधिकाऱ्याला बाधित व्यक्तीला तिच स्त्रीधन किंवा इतर कोणतीही मालमत्ता किंवा ती हक्कदार आहे अशी मौल्यवान प्रतिभूती उत्तराधिकाऱ्याने परत करावी असे त्याला निदेश देता येतील.