महिलांचे संरक्षण अधिनियम २००५
कलम १६ :
कार्यवाही कक्षांतर्गत करावयाची :
प्रकरणाची परिस्थिती तशी मागणी करीत असल्याचे दंडाधिकाऱ्याचे मत असेल आणि जर, कार्यवाहीतील कोणत्याही पक्षाची तशी इच्छा असेल तर दंडाधिकाऱ्याला या अधिनियमाखालील कार्यवाही कक्षांतर्गत पार पाडता येईल.
