महिलांचे संरक्षण अधिनियम २००५
कलम १४ :
समुपदेशन :
(१) दंडाधिकाऱ्यास, या अधिनियमाखालील कार्यवाहीच्या कोणत्याही टप्प्यात, उत्तरवादीला किंवा बाधित व्यक्तीला, एकतर एकेकट्याने पृथकपणे किंवा संयुक्तपणे, सेवा पुरविणाऱ्याचा जो सदस्य विहित करण्यात आलेल्या पात्रता व अनुभव असलेला आहे त्याच्याकडून समुपदेशन घेण्याचे निदेश देता येतील.
(२) दंडाधिकाऱ्याने, पोटकलम (१) अन्वये कोणतेही निदेश दिले असतील अशा बाबतीत, तो, प्रकरणाच्या पुढच्या सुनावणीसाठी, दोन महिन्यांपेक्षा अधिक नसेल अशा कालावधीतील तारीख निश्चित करील.