Posh act 2013 कलम ७ : १.(स्थानिक समितीची) रचना, मुदत आणि अन्य अटी व शर्ती :

Posh act 2013
कलम ७ :
१.(स्थानिक समितीची) रचना, मुदत आणि अन्य अटी व शर्ती :
(१) १.(स्थानिक समितीमध्ये) जिल्हा अधिकाऱ्याकडून नामनिर्देशित केल्या जाणाऱ्या पुढील सदस्यांचा समावेश असेल :
(a)क)(अ) सामाजिक कार्याच्या क्षेत्रातील व महिलांच्या विवादाशी परिचित असलेल्या पात्र महिलांमधून नामनिर्देशित करावयाचा अध्यक्ष;
(b)ख)(ब) जिल्ह्यातील गटामध्ये, तालुक्यामध्ये किंवा तहसीलामध्ये किंवा प्रभागामध्ये किंवा नगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या महिलांमधून नामनिर्देशित करावयाचा एक सदस्य;
(c)ग) (क) महिलांच्या विवादाशी परिचित असलेल्या अशासकीय संघटनांमधून किंवा असोसिएशनमधून किंवा लैंगिक छळवणूकीशी संबंधित असणाऱ्या विषयांशी परिचित असलेल्या व्यक्तीमधून नामनिर्देशित करावयाचे विहित करण्यात येतील असे दोन सदस्य, त्यापैकी एक महिला सदस्य असेल :
परंतु, नामनिर्देशित केलेल्या व्यक्तींपैकी कमीत कमी एक नामनिर्देशित व्यक्तीस कायद्यामधील विशेष गती असेल किंवा कायदेविषयक ज्ञान असेल :
परंतु, आणखी असे की, नामनिर्देशित व्यक्तींपैकी, किमान एक नामनिर्देशित व्यक्ती, केंद्र सरकारने वेळोवेळी अधिसूचित केलेल्या अनुसूचित जातीमधील किंवा अनुसूचित जमातीमधील किंवा इतर मागासवर्गातील किंवा अल्पसंख्याक समाजामधील महिला असेल.
(d)घ)(ड) जिल्ह्यातील समाजकल्याण किंवा महिला बालविकास यांच्याशी संबंधित असणारा अधिकारी, पदसिद्ध सदस्य असेल.
(२) स्थानिक समितीचा अध्यक्ष किंवा प्रत्येक सदस्य, जिल्हा अधिकाऱ्याद्वारे विनिर्दिष्ट करण्यात येईल, त्याप्रमाणे त्याच्या नियुक्तीच्या तारखेपासून तीन वर्षांपेक्षा अधिक नसेल अशा कालावधीकरिता पद धारण करील.
(३) जेव्हा १.(स्थानिक समितीचा) अध्यक्ष किंवा कोणताही सदस्य –
(a)क)(अ) कलम १६ च्या तरतुदीचे उल्लंघन करील तेव्हा; किंवा
(b)ख)(ब) त्याला एखाद्या अपराधाबद्दल दोषसिद्ध ठरविण्यात आले असेल तेव्हा किंवा त्या त्या वेळी अंमलात असणाऱ्या कोणत्याही कायद्यान्वये एखाद्या अपराधासाठी त्याच्याविरूद्ध चालू असलेली चौकशी प्रलंबित असेल तेव्हा; किंवा
(c)ग) (क) कोणत्याही शिस्तभंगविषयक कार्यवाहीमध्ये तो दोषी असल्याचे आढळून आले असेल किंवा त्याच्याविरूद्ध शिस्तभंगविषयक कार्यवाही प्रलंबित असेल तेव्हा; किंवा
(d)घ) (ड) त्याने त्याच्या पदाचा अशा प्रकारे गैरवापर केला असेल की, ज्यामुळे त्याला पदावर नियमितपणे ठेवणे लोकहितास बाधक ठरेल तेव्हा,
अशा अध्यक्षाला, किंवा यथास्थिती, सदस्याला, समितीतून काढण्यात येईल आणि अशा प्रकारे तयार झालेले रिक्त पद किंवा कोणतेही नैमित्तिक रिक्त पद, या कलमाच्या तरतुदीनुसार नवीन नामनिर्देशनातून भरण्यात येईल.
(४) पोटकलम (१) च्या खंड (ब) व (ड) याअन्वये नामनिर्देशित केलेल्या सदस्यांव्यतिरिक्त स्थानिक संस्थेचा अध्यक्ष व सदस्य स्थानिक समितीची कार्यवाही चालविण्यासाठी विहित करण्यात येईल, असे शुल्क किंवा भत्ते मिळण्यास हक्कदार असतील.
——-
१. २०१६ चा अधिनियम क्रमांक २३ याच्या कलम ३ व अनुसूची २ अन्वये स्थानिक तक्रार समिती या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply