Posh act 2013
कलम ६ :
१.(स्थानिक समिती) घटित करणे व तिची अधिकारिता :
(१) ज्या आस्थापनेमध्ये दहापेक्षा कमी कामगार असल्यामुळे २.(अंतर्गत समिती) घटित करण्यात आलेली नसेल तेव्हा किंवा तक्रार, स्वत: मालकाविरूद्ध असेल तर, जिल्हा अधिकारी अशा आस्थापनांमधील लैंगिक छळवणूकीच्या तक्रारी स्वीकारण्याकरिता १.(स्थानिक समिती) म्हणून संबोधली जाणारी एक समिती, संबंधित जिल्ह्यामध्ये घटित करील.
(२) जिल्हा अधिकारी, तक्रारी प्राप्त करण्यासाठी सात दिवसांच्या कालावधीत त्या संबंधित १.(स्थानिक समितीकडे) पाठविण्याकरिता ग्रामीण किंवा आदिवासी क्षेत्रामधील प्रत्येक गटामध्ये, तालुक्यामध्ये व तहसीलामध्ये आणि नागरी क्षेत्रामधील प्रभागामध्ये किंवा नगरपालिकेमध्ये एक नोडल अधिकारी पदनियुक्त करील.
(३) १.(स्थानिक समितीची) अधिकारिता ज्या जिल्ह्यामध्ये ती घटित केली आहे, त्या जिल्ह्याच्या क्षेत्रास लागू असेल.
——–
१. २०१६ चा अधिनियम क्रमांक २३ याच्या कलम ३ व अनुसूची २ अन्वये स्थानिक तक्रार समिती या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. २०१६ चा अधिनियम क्रमांक २३ याच्या कलम ३ व अनुसूची २ अन्वये अंतर्गत तक्रार समिती या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.