Posh act 2013 कलम ३ : लैंगिक छळवणूकीस प्रतिबंध :

Posh act 2013
कलम ३ :
लैंगिक छळवणूकीस प्रतिबंध :
(१) कोणतीही महिला, कोणत्याही कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणूकीस बळी पडणार नाही.
(२) इतर परिस्थितीबरोबरच पुढील परिस्थितीत, जर एखादी कृती लैंगिक छळवणूकीच्या कोणत्याही कृत्याच्या संबंधात घडत असेल तर किंवा वर्तणुकीच्या संबंधात अस्तित्वात असेल तर ती कृती लैंगिक छळवणूक असल्याचे समजण्यात येऊ शकेल :
(एक) तिच्या नोकरीमध्ये विशेष वागणूक देण्याचे ध्वनित किंवा व्यक्त वचन; किंवा
(दोन) तिच्या नोकरीमध्ये भेदभावकारी वागणूक देण्याची ध्वनित किंवा व्यक्त धमकी; किंवा
(तीन) तिच्या सध्याच्या किंवा भावी नोकरीच्या स्थितीबद्दलची ध्वनित किंवा व्यक्त धमकी; किंवा
(चार) तिच्या कामात हस्तक्षेप करणे किंवा तिला धाकदपटशा दाखविणे किंवा प्रक्षोभक किंवा प्रतिकूल कामाचे वातावरण निर्माण करणे; किंवा
(पाच) तिचे आरोग्य किंवा सुरक्षा यांना बाधा होण्याचा संभव असणारी हीन वागणूक.

Leave a Reply