Posh act 2013 कलम २६ : या अधिनियमाच्या तरतुदीचे पालन न केल्याबद्दल शास्ती :

Posh act 2013
कलम २६ :
या अधिनियमाच्या तरतुदीचे पालन न केल्याबद्दल शास्ती :
(१) जेव्हा मालक –
(a)क)(अ) कलम ४ च्या पोटकलम (१) अन्वये अंतर्गत समिती गठित करण्यास कसूर करील तेव्हा;
(b)ख)(ब) कलम १३, १४ व २२ अन्वये कारवाई करण्यास निष्फळ ठरेल तेव्हा; आणि
(c)ग) (क) या अधिनियमाच्या अन्य तरतुदींचे किंवा त्याखाली केलेल्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन करील किंवा उल्लंघन करण्याचा प्रयत्न करील किंवा उल्लंघन करण्यास अपप्रेरणा देईल तेव्हा,
तो पाच हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या दंडाच्या शिक्षेस पात्र असेल.
(२) जर कोणत्याही मालकाने, या अधिनियमान्वये शिक्षापात्र असलेल्या अपराधाबद्दल पूर्वी दोषसिद्ध ठरविण्यात आल्यानंतर तसाच अपराध केला असेल तर व अशाच अपराधाबद्दल तो दोषसिद्ध ठरला असेल तर तो, –
(एक) त्याच अपराधाकरिता तरतूद केलेल्या कमाल शिक्षेस अधीन राहून, पहिल्या दोषसिद्धीबद्दल जी लादण्यात येऊ शकेल अशा शिक्षेच्या दुप्पट शिक्षेस पात्र असेल :
परंतु, ज्या अपराधाकरिता आरोपीवर खटला दाखल करण्यात आला असेल अशा अपराधासाठी त्या त्या वेळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यान्वये, शिक्षा विहित केलेली असेल तर, न्यायालय शिक्षा देतेवेळी त्याची योग्य ती दखल घेईल.
(दोन) सरकारकडून किंवा स्थानिक प्राधिकरणाकडून, त्याचा व्यवसाय किंवा कार्य करण्याकरिता आवश्यक असलेले लायसन रद्द करण्यास, किंवा काढून घेण्यास, किंवा त्याचे नूतनीकरण न करण्यास, त्याची मान्यता रद्द करण्यास, किंवा त्याची नोंदणी रद्द करण्यास पात्र असेल.

Leave a Reply