Posh act 2013 कलम २५ : माहिती मागविण्याचा व अभिलेखाचे निरीक्षण करण्याचा अधिकार :

Posh act 2013
कलम २५ :
माहिती मागविण्याचा व अभिलेखाचे निरीक्षण करण्याचा अधिकार :
(१) समुचित शासन, तसे करणे लोकहितार्थ किंवा कामाच्या ठिकाणी असलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या हितार्थ आवश्यक आहे, अशी खात्री पटल्यावर लेखी आदेशाद्वारे –
(a)क)(अ) त्याला आवश्यक असेल अशी लैंगिक छळवणुकीशी संबंधित असणारी माहिती लेखी स्वरूपात सादर करण्यासाठी कोणत्याही मालकास किंवा जिल्हाधिकाऱ्यास बोलावील.
(b)ख)(ब) लैंगिक छळवणुकीशी संबंधित असणाऱ्या अभिलेखाचे व कामाच्या ठिकाणाचे निरीक्षण करण्याकरिता कोणत्याही अधिकाऱ्यास प्राधिकृत करील, तो अशा निरीक्षणाचा अहवाल आदेशामध्ये विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा कालावधीत सादर करील.
(२) प्रत्येक मालक व जिल्हा अधिकारी, अधिकाऱ्याने निरीक्षण करण्यापूर्वी मागणी केल्यावर अशा निरीक्षणाचा विषय असणारी त्याच्या ताब्यातील सर्व माहिती अभिलेख व अन्य दस्तऐवज सादर करील.

Leave a Reply