Posh act 2013
कलम १० :
समझोता :
(१) अंतर्गत समिती, किंवा यथास्थिती, स्थानिक समिती कलम ११ अन्वये चौकशी सुरू करण्यापूर्वी आणि पीडित महिलेच्या विनंतीवरून ती व उत्तरवादी यांच्यामधील प्रकरणाचा समझोता करण्याकरिता उपाययोजना करील :
परंतु, समझोत्याचा आधार म्हणून कोणतीही आर्थिक तडजोड करण्यात येणार नाही.
(२) जेव्हा पोटकलम (१) अन्वये समझोता घडून आला असेल तेव्हा, अंतर्गत समिती, किंवा यथास्थिती, स्थानिक समिती, अशा प्रकारे केलेला समझोता अभिलिखित करील आणि शिफारशींमध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे कारवाई करण्याकरिता तो मालकाकडे किंवा जिल्हा अधिकाऱ्याकडे पाठवील.
(३) अंतर्गत समिती, किंवा यथास्थिती, स्थानिक समिती, पोटकलम (२) अन्वये अभिलिखित केल्याप्रमाणे समझोत्याच्या प्रती, पीडित महिलेस, उत्तरवादीस देईल.
(४) जेव्हा पोटकलम (१) अन्वये समझोता घडून आला असेल तेव्हा, अंतर्गत समितीकडून किंवा स्थानिक समितीकडून आणखी कोणतीही चौकशी करण्यात येणार नाही.