Pocso act 2012 कलम ३८ : बालकाची साक्ष नोंदवून घेतेवेळी दुभाषी किंवा तज्ज्ञ यांचे साहाय्य :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
कलम ३८ :
बालकाची साक्ष नोंदवून घेतेवेळी दुभाषी किंवा तज्ज्ञ यांचे साहाय्य :
१) जेथे आवश्यक असेल तेथे न्यायालय बालकाची साक्ष नोंदवून घेतेवेळी विहित करण्यात येईल अशी अर्हता व अनुभव असलेल्या अनुवादक किंवा दुभाषीची आणि विहित करण्यात येईल अशी फी प्रदान केल्यावर मदत घेता येईल.
२) जर बालक मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या विकलांग असेल तर विशेष न्यायालयाला बालकाची साक्ष नोंदविण्यसाठी विहित करण्यात येईल अशी अर्हता व अनुभव असलेल्या विहित करण्यात येईल अशी फी प्रदान केल्यावर बालकाशी संवाद साधण्याशी परिचित असलेल्या विशेष शिक्षणतज्ज्ञाचे किंवा कोणत्याही व्यक्तीचे किंवा त्या क्षेत्रातील तज्ज्ञाचे साहाय्य घेता येईल.

Leave a Reply