लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
कलम ३५ :
बालकाची साक्ष नोंदविण्यासाठीचा व प्रकरण निकालात काढण्यासाठीचा कालावधी :
१) विशेष न्यायालयाने अपराधाची दखल घेतल्यापासून तीस दिवसांच्या आत बालकाची साक्ष नोंदविण्यात येईल आणि त्यामध्ये विलंब झाल्यास विलंबाची कारणे कोणतीही असल्यास विशेष न्यायालयाकडून ती नोंदविण्यात येतील.
२)विशेष न्यायालय, यथासंभव, अपराधाचे विचारण अपराधाची दखल घेतल्यापासून एक वर्षाच्या आत पूर्ण करेल .